सोलापूर! दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई



सोलापूर-द कश्मीर फाइल्स हा चित्रपट संपूर्ण भारतात चर्चेचा विषय झाला आहे. त्या चित्रपटातील विषयावरून वेगवेगळी मतांतरे समोर येत आहेत. सोलापुरात एका संघटनेच्यावतीने महिला व युवकांना हा चित्रपट दाखवण्यात आला होता.चित्रपट पाहून झाल्या नंतर काही जणांनी महिला, मुली व तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला होता.

त्याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल झाल्याने सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते.ऐन गुडी पाडव्याला व रमजान सण प्रारंभी हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने पोलीस प्रशासना समोर मोठा पेच निर्माण झाला होता.पण एमआयडीसी पोलिसांनी सतर्कता बाळगून ताबडतोब व्हिडीओ मधील दोन इसमाना ताब्यात घेतले आहे. 

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.याबाबत डीसीपी डॉ वैशाली कडुकर यांनी कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.सोलापुरातील शांततेला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची पूर्ण दक्षता सोलापूर पोलीस घेत आहेत अशी माहिती दिली.आणि नागरिकांनी देखील सोलापूरची शांतता भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.



 चित्रपट पहिल्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न -
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चित्रपट गृहात काही इसमानी महिलाना, मुलींना व तरुणांना चिथावणीखोर भाषण करून दुसऱ्या समाजबाबत भडकवण्याचा प्रयत्न केला होता.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होताच सोलापुरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.काही समाजसेवकांनी ताबडतोब निवेदन प्रत तयार करून पोलीस आयुक्त कार्यालय गाठले आणि संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी केली.डीसीपी डॉ वैशाली कडुकर यांनी देखील याची गंभीर दखल घेत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

एमआयडीसी पोलिसांनी दुपारीच दोन संशयीत इसमाना ताब्यात घेतले-
ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.याबाबत सोलापूर शहर पोलिसांच्या गुप्तचर विभागाने याची सविस्तर माहिती घेत ,एमआयडीसी पोलिसांना दिली होती.शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी व्हिडीओमधील दोन संशयीताना ताब्यात घेतले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा आदेशानुसार यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहे.




Post a Comment

0 Comments