‘मी आंबेडकरांचा भक्त, अंधभक्त नाही’ मुख्यमंत्री ठाकरेंचा रोख कुणाकडे?सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही’ असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला.

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ या पुस्तकाचा विमोचन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरसद्वारे हजेरी लावली. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलिसी’ पुस्तक विमोचन सोहळ्याला हजर राहू शकलो नाही याबद्दल थोडं दुःख आहे. मुख्यमंत्र्याला आळशीपणा परवडणारा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्वत: बद्दलच टीप्पणी केली.

(लव्ह, सेक्स अँड मर्डर, 19 वर्षीय तरुणासोबत समलैंगिक संबंध ठेवले अन्….) ‘सध्या अंधभक्तांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. अंधभक्त सोईनुसार भूमिका घेत असतात. पण मी डॉ आंबेडकर आंबेडकर यांचा भक्त आहे, अंध भक्त नाही’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मागच्या अडीच वर्षात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी हे आगळेवेगळे तयार झालेले रसायन आहे.

नितीन राऊत यांनी अभ्यासपूर्वक पुस्तक लिहिले याचा मला आनंद आहे. डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचे विचार हे दिशा दाखवणारे असतात. संविधाननुसार काम करतांना कोणत्या अडचणी येतात हे सांगितले व त्याचे मार्ग पण सुचवले. फक्त जयंती साजरी करतांना पुष्पगुच्छ देऊन चालणार नाही तर त्यांचे विचार आचरणात आणणे देखील तितकेच महत्वाचे आहे, असं मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

Post a Comment

0 Comments