माणसे जिवंत असताना जातीच्या नावाखाली भांडतात काही वेळेस जातीच्या भांडणात अनेकांनी जीव गमावला. जीव गेल्यानंतर जातीची तीव्रता समजते. मात्र बार्शी तालुक्यातील उंबर्गे गावाने जिवंतपणी चा आदर्श मेल्यानंतरही कायम ठेवला आहे. त्यांनी चक्क हिंदू आणि मुस्लिम बांधवांना एकत्रित केले आहे. म्हणजेच काय दफनभूमी आणि स्मशानभूमी ही एकत्र आणून एक नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. माणुसकी पेक्षा जात मोठी नाही याचे उत्तम उदाहरण उंबर्गे गावाने दाखवून दिले आहे.
गावामध्ये दावल मलिक साहेब दर्गाह असून याठिकाणी देवस्थानची सात गुंठे जागा आहे. या दर्गा मध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होते. दफनभूमी साठी जागा कमी पडू लागल्याने त्याठिकाणी दफनभूमी चा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मुस्लिम बांधवांना हिंदू बांधवांनी साथ देत त्यांची अडचण दूर केली आहे. बंधुत्वाचे अनमोल मार्गदर्शन करत त्यांनी चक्क स्मशानभूमीमध्ये दफनभूमीसाठी जागा दिली असून एकत्रित नांदण्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी सरपंच दादा विधाते, पोलीस पाटील राहुल पाटील,काकासाहेब जाधव,महंमद मुजावर,नवनाथ विधाते,ईलु फकीर,धनुभाऊ विधाते,संतोष घंटे,विकास विधाते,आदिल फकीर,सागर एडके,चांदसाहेब शेख,शहाबुद्दीन मुजावर,रसुल फकीर, त्र्यिंबक हावळे,श्रीधर कदम,सादिक फकीर,बालाजी विधाते,जावेद फकीर, हुसेन फकीर उपस्थित होते.
0 Comments