सोलापूर! विवाहितेवर अॅसिड टाकण्याची धमकी



माहेरून १६ लाख रूपये आण असे म्हणून अंगावर अॅसिड टाकून सौदर्य बिघडवून टाकू अशी धमकी सासरच्या लोकांनी विवाहितेला देवून शारीरीक व मानसिक छळ केल्याचे उघड झाले. प्रांजली राहुल चंदनशिवे (वय ३१, रा. घर नं. १६४, संजय नगर कुमठा नाका सोलापूर) असे पिडीत विवाहितेचे नाव आहे. हिचा विवाह राहुल गौतम चंदनशिवे याच्याशी झालेला होता लग्नाच्या काही दिवसानंतर पासूनच पती राहूल, सासू लोपामुद्रा, सासरा गौतम, दीर ऋतुराज, नणंद प्रमिला तोरणे, पिंकी सोनवणे, नंदवा सुरेश सोनवणे, सचिन गायकवाड (सर्व रा. दिघंची आटपाडी, जि. सांगली) या सर्वजणांनी मिकळून माहेरच्या माणसांना अश्लील शिवीगाळ करून अपमान केले. 

पतीला असलेला कोडचा आजार लपवून विवाह लावून फसवणुक केली. तसेच पुण्यात फ्लॅट घ्यायचे आहे असे म्हणून माहेरून वडीलांकडून १६ लाख रूपये आण आम्हाला लग्नात महागड्या वस्तु दिल्या नाहीत असे म्हणून मारहाण केले तसेच अंगावर अॅसिड टाकून तुझे सौदर्य बिघडवून टाकू अशी दमदाटी देवून शारीरीक व मानसिक छळ केल्याची फिर्याद प्रांजली चंदनशिवे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली पुढील तपास महिला पोलीस नाईक वाघमोडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments