कोरफळे गावामध्ये सामायिक वाटेचा चा प्रश्न मिटवा, वाटणीचा नंतर बघू. सामायिक वाटेचा प्रश्न मिटवण्यासाठी गेलेल्या दोन भावांपैकी एकाला कुराडीच्या उलट्या झाल्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे, बाबुराव दत्तात्रेय पाटील (वय 30) रा. कोरफळे तालुका बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 4 जणांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कोरफळे गावांमध्ये गट नंबर 70 हा सामायिक आहे आधी सामाजिक वाटेचा प्रश्न मिटवा मग वाटेचे बघू असे म्हटल्यामुळे फिर्यादीला व त्याच्या भावाला शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाटणी करून दिली नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली आहे. फिर्यादी मेळा तक्रारीनुसार संभाजी कल्याण पाटील (वय 35) राजेंद्र शिवाजी पाटील (वय 30) कल्याण शिवाजी पाटील (वय 27) करण कल्याण पाटील (वय 30) सर्वजण रा. कोरफळे ता. बार्शी यांच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल डुकले हे करत आहे.
0 Comments