राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी वकील सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जयश्री पाटील यांचा शोध सुरू आहे. सदावर्ते यांच्या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडलं होतं. ९ तारखेला सदावर्ते यांना न्यायलयात हजर केलेल्या दिवसांपासून त्यांनी संरक्षण सोडलं होतं.
वकील प्रदीप घरात यांनी न्यायलयात जयश्री पाटील यांचे नाव घेतल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नसुन त्यांचा मोबाईलही बंद आहे. पोलिसांनी युद्ध पातळीवर त्यांचा शोध सुरु केला आहे.
0 Comments