वैराग! शेत वहिवाटी वरून पती पत्नीस मारहाण; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


बार्शी : शेत वहिवाटणीच्या कारणांवरुन पती पत्नीस मारहाण केल्याची घटना बार्शी तालुक्यातील भालगांव येथे घडली.

दि. ५ एप्रिल २०२२ रोजी सांयकाळी सहाच्या सुमारास
शेतातून घरी परत येत असताना मला वाटेत अडवून आमचे गांवातील किशोर भारत कराड, भारत शंकर कराड, सुमन भारत कराड, उज्वला किशोर कराड (सर्व रा. भालगांव ता.बार्शी) यांनी मला व माझ्या पतीला तू शेतात का नांगरले, तुझा शेतात काय संबंध असे म्हणत, शेत वहिवाटणीच्या कारणावरुन वेळूच्या काठीने वळ उठेपर्यंत मारहाण करुन जखमी केले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार वैशाली राहुल कराड (वय ३०) रा. भालगांव, ता. बार्शी यांनी वैराग पोलीस ठाण्यात
दिली.

त्यावरुन त्या चौघांविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम ३२३, ३२४, ३४, ३४१, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments