जवान गोरख हरिदास चव्हाण यांचा उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघातात वीरमरण बार्शी तालुक्याचे सुपुत्र रातंजन येथील जवान गोरख हरिदास चव्हाण हे उत्तराखंड येथे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात त्यांना वीरमरण आले, कर्तव्यावर असताना गाडी दरीत कोसळली अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी आठ वर्षाचा मुलगा पाच वर्षाची मुलगी भाऊ भावाची पत्नी असा परिवार आहे त्यांच्या अचानक जाण्याने रातचा सह बार्शी तालुक्यात शोककळा पसरली आहे. गेल्यात दीड महिन्यांमध्ये बार्शी तालुक्यातील जवान शहीद होण्याची ही तिसरी वेळ आहे.
0 Comments