सोनमचे रॉयल लूकमध्ये बेबी बंप फोटोशूट..!



कॉमेडियन भारती सिंहने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म देवून चाहत्यांना गुडन्यूज दिली. आता भारतीच्या पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर देखील लवकरच आई होणार आहे. तर सध्या सोनमने रॉयल लूकमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

सोनम कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर राजेशाही थाटात लेटेस्ट फोटोशूट केले आहेत. या फोटोत सोनम रॉयल लूकमध्ये  खूपच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे. फोटोशूटवेळी सोनमने पांढऱ्या रंगाच्या साटीन इंडोवेस्टर्न आउटफिटसोबत (रॅपअप साडी) साजेशीर दागिने परिधान केले आहेत. यासोबतच तिने न्यूड लिपस्टिकसह डार्क आय मेकअप केला आहे. तर पायात चकाकणारे बूड घातले आहेत. या सगळ्यासोबत तिच्या मोकळ्या सोडलेल्या केसांनी सौंदर्यात भर घातली आहे. फोटोला पोझ देताना सोनमच्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Last night for my @abujani1 birthday evening. In. असे लिहिले आहे. यासोबतच तिने बहीण रिया कपूर आणि आई सुनीता कपूर यांचेही आभार मानले आहेत. हे फोटोशूट प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला याच्यासाठी केले गेले आहे.

फोटोत सोनमच्या पाठिमागे एक पेंटिंग, काही जळत्या मेणबत्ती, खुर्ची आणि लाकडी वाघाचा पुतळा दिसत आहे. सोनमने इंस्टाग्रामवर पाच फोटो शेअर केले आहेत. यात पहिल्या फोटोत दागिन्यांवर हात ठेवत बाजूला पोझ दिली आहे. दुस-या फोटोत ती एखाद्या राणीसारखी खुर्चीवर बसलेली दिसतेय. तिसर्‍या फोटोत एका बाजूला पाहत असून चौथ्या फोटोत स्वत: चे डोळे मिटून हटके पोझ दिली आहे. तर पाचव्या फोटोत तिने आपला संपुर्ण लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी कॉमेन्टस केल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसह अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने ‘ग्लॅमरस’, ‘क्यूट’ असे म्हटले आहे. यासिवाय काही चाहत्यांनी हार्ट आणि फायरचा ईमोजी शेअर केला आहे.

याआधी सोनमने पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने ‘आम्ही तुम्हाला शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने वाढवण्याचा प्रयत्न करू. एक कुटुंब…जो तुमच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करेल आणि एकत्र राहिल…तुमच्या स्वागतासाठी आता थांबू शकत नाही.’ लिहिले होते. या फोटोवरून सोमनच्या कुटूबियांना ती आई होणार असण्याची गुडन्यूज मिळाली होती. यानंतर सोमनची बहिण रिया कपूर, आई सुनीता कपूर आणि सासू प्रिया आहुजा यांनी येणाऱ्या छोट्या पाहुण्याबद्दल उत्सूक होते.

Post a Comment

0 Comments