सोलापूर/ प्रतिनिधी:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत कु. ऐश्वर्या महेंद्र उंबरजे यांची सहाय्यक अभियंता वर्ग-२ जलसंपदा विभाग या पदावर निवड झाली आहे. अधिकाऱ्यांचं कुटुंब अशी ओळख असणाऱ्या कुटुंबातील ऐश्वर्या उंबरजे यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
कुमारी ऐश्वर्या हिचे शिक्षण मेघा इन्स्टिट्यूट हैद्राबाद येथे अकरावी व बारावी, वालचंद कॉलेज सोलापूर येथे सिव्हिल अभियांत्रिकी व विसवेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे अर्बन प्लॅनिंग मध्ये M. Tech झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता महेंद्र उंबरजे व सविता उंबरजे यांची मुलगी व महा एन.जी.ओ. फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांची पुतणी आहे.
ऐश्वर्या व उंबरजे कुटुंब हे मूळचे औज मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील आहेत. या निवडीबद्दल सोलापूर शहर व जिल्ह्यातून अनेक मान्यवरांनी कु. ऐश्वर्या हिचे अभिनंदन केले आहे.
0 Comments