सोलापूर/प्रतिनीधी:
केगाव परिसरातील चंदनाची झाडे तोडून ती दुचाकीवरून घेऊन जाताना दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. पिंटू भीमा गायकवाड (वय २७, रा. मोहोळ) व आकाश भैरू भोसले (वय १९, रा. मोहोळ) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत.
सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून दोघे चंदनाची लाकडे घेऊन जाणार असल्याची गोपनीय बातमीदार मार्फत माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे सोलापूर विद्यापीठ परिसरात पोलिसांनी सापळा लावत दुचाकीवरील पिंटू गायकवाड, आकाश भोसले या दोघांना पकडले. त्यांच्याकडील जवळपास ४७ किलो चंदनाची लाकडे पोलिसांनी हस्तगत केली.चंदनाच्या लाकडासह,मोटरसायकल व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शैलेश खेडकर, एएसआय नीळकंठ जाधवर, हवालदार प्रकाश कारटकर, हरिदास पांढरे यांनी केली.
0 Comments