मुलीच्या मजबुरीचा फायदा घेत तांत्रिकाने केले गैरकृत्य



अंधश्रद्धा माणसाला कोणत्या थराला घेऊन जाते याचे एक भयानक उदाहरण समोर आलेले आहे. मध्यप्रदेश उज्जैनमधून  २१ वर्षीय तरुणीवर बलात्कारझाल्याची घटना समोर आली आहे. जादूटोण्याच्या नावाखाली एका तांत्रिकाने  एका मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तांत्रिकाला अटक  केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

२१ वर्षीय पीडित तरुणी मानसिकदृष्ट्या कमकुवत आहे. तिची आई तिच्या मुलीची बुद्धी तल्लख करण्यासाठी तांत्रिकाकडे घेऊन गेली होती. यादरम्यान आरोपीने आईला काहीतरी बहाणा करून खोलीबाहेर नेले आणि मुलीवर बलात्कार  केल्याची घटना घडली.

Post a Comment

0 Comments