वैराग! टोळीची माहिती पोलिसांना देतो असे म्हटल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू


गुन्हेगारी टोळी ची माहिती पोलिसाना देतो असे म्हटल्यामुळे एका तरुणाला टोळीतील चार-पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे, या घटनेची फिर्याद सुरेश महादेव पवार (वय ३९) रा.संजयनगर वैराग ता.बार्शी दिली असून त्यानुसार  त्यामुळे ४ जणांविरुद्ध वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना ही २ एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली, चोरीच्या सोन्याहून चाललेली भांडणे मिटवून तुमची माहिती पोलिसाला देतो असे म्हणल्यामुळे पप्पू कांबळे यांना बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता. लाकडी ठोकळे यांनी व धारदार शस्त्राने मारहाण केली, हरी केकडे याचे सागंणे वरून जुबेर शेख , मिथुन साळवे व अखील मारहाण केली असेही फिर्याद मध्ये नमूद करण्यात आले आहे. उपचारासाठी त्यांना तात्काळ जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरच्या सल्ल्याने ३ एप्रिल रोजी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी त्यांना हालवण्यात आले. अश्विनी हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे, मयताची १५ हजार किमतीची ड्रीम युगा गाडी त्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. ४ जणांविरुद्ध विविध कलमांतर्गत वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या घटनेचा अधिक तपास वैराग पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments