मुंबईत बारबालेसह बहिणीवर ब्लेड हल्ला



मुंबईतील चारकोप येथे राहणारी बारबाला आणि तिच्या बहिणीवर ब्लेड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या माजी प्रियकराने दोघींवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. आरोपी आणि बारबाला हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 

ते एकमेकांचे चांगले मित्र होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून बारबालेचे आरोपीसोबत संबंध दुरावले होते आणि ते एकमेकांशी बोलतही नव्हते. याच रागातून दोघी बहिणींवर हल्ला झाल्याचा संशय आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारबाला शुक्रवारी रात्री बहिणीसोबत चारकोप येथील घरात पोहोचली, तेव्हा तिचा एक्स बॉयफ्रेण्ड इमारतीखाली आधीच उपस्थित होता. आरोपीने आधी प्रेयसीवर ब्लेडने वार केले आणि नंतर पीडितेला वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीवर हल्ला करुन तो फरार झाला.

तीन वर्षांपासून दोघांची ओळख पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, आरोपी आणि बारबाला हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून बारबालेने आरोपीसोबत संबंध कमी केले, तसेच ते बोलतही नव्हते.

दोघींवर हल्ला करुन आऱोपीचा पळ शुक्रवारी रात्री बारबाला आपल्या बहिणीसह इमारतीत पोहोचताच तिच्या माजी प्रियकराने दोघींवर ब्लेडने वार करुन तिथून पळ काढला. सध्या चारकोप पोलीस आरोपी संजय सुर्वेविरुद्ध भादंवि 354 आणि 324 अन्वये एफआयआर नोंदवून आरोपीचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments