दशकभरापूर्वी भारतीयांना प्रेमात पाडणाऱ्या पाकिस्तानातील महिला नेत्या हिना रब्बानी खार पुन्हा चर्चेचा विषय बनल्या आहेत.
हिना रब्बानी खार यांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे सत्तांतरानंतर पाकिस्तानातील नव्या सरकारमध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
हिना रब्बानी खार या आता पाकिस्तानच्या उपपरराष्ट्र मंत्री असणार आहेत.
पुरूष केंद्री राजकारणातही हिना रब्बानी खार यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पाकिस्तानातील राजकारणाबरोबरच त्यांना जगभरातही त्यांना ओळखलं जातं.
पाकिस्तानात इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळलं. त्यानंतर शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आलं आहे.
पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्री पद भूषवणाऱ्या हिना रब्बानी खार या पहिल्या महिला नेत्या होत्या. इतकंच नाही, तर त्या सर्वात तरुण परराष्ट्र मंत्री होत्या.
0 Comments