मराठी फिल्मफेअर अवॉर्ड: हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानकरी



मराठी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांच्या सन्मानासाठी दिला जाणारा आणि चित्रपट जगतात सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये अनेक कलाकारांनी बाजी मारली आहे.

या कार्यक्रमाच्या आधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या पुरस्कार सोहळ्यात अंकुश चौधरी, हेमंंत ढोमे अशा कलाकारांनी बाजी मारली आहे. या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची यादी आपण पाहणार आहोत.

सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम: अमितराज (झिम्मा)

सर्वोत्कृष्ट गीत: गुरु ठाकूर- प्रीतम (कोणा मागं भिरभिरता)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : आदर्श शिंदे – ( धुरळा)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : अपेक्षा दांडेकर (झिम्मा, माझे गाव )

सर्वोत्कृष्ट कथा : अच्युत नारायण- (वेगळी वाट )

सर्वोत्कृष्ट पटकथा : चैतन्य ताम्हाणे- (द डिसिपल)

सर्वोत्कृष्ट संवादः इरावती कर्णिक (झिम्मा) आणि क्षितिज पटवर्धन (धुरळा)

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : पूजा तलरेजा आणि रविन डी करडे

सर्वोत्कृष्ट संकलन : अभिजित देशपांडे आणि सौरभ प्रभुदेसाई (बळी

सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) – रेशम श्रीवर्धन

सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता): रुतुराज वानखेडे – (जयंती) आणि विराट मडके – (केसरी)

सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: अमर भारत देवकर (म्होरक्या) आणि नवीन देशबोईना- (लता भगवान करे )

सर्वोत्कृष्ट चित्रपट: झिम्मा आणि कारखानीसांची वारी

सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक: द डिसिपल आणि भोंगामराठी चित्रपटसृष्टीतील योगदान: सुलोचना

लाटकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : मंगेश जोशी ( कारखानीसांची वारी)

सर्वोत्कृष्ट अभिनेता : अंकुश चौधरी (धुरळा )

या प्रसिद्ध पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचालन अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधवने त्यांच्या खास शैलीत पार पाडले. या भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याला मृणाल कुलकर्णी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत यांच्या डान्सने सर्वांनाच मोहित केले.

 



 

 

 

Post a Comment

0 Comments