भावकीतील विवाहित अल्पवयीन मुलीसोबत फोटो काढून तिला लग्न कर नाही तर तुझ्यावर बलात्कार करीन अशी धमकी देण्यात आली. त्यातून तिने विषारी औषध घेतले आणि आत्महत्या केली. या प्रकरणी आकाश मुरलीधर कारंडे, उज्ज्वला मुरलीधर कारंडे व मुरलीधर कुंडलिक कारंडे (रा. कारंडेमळा, मोराळवाडी, ता. बारामती) या तीन जणांच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सुईसाईड नोटमध्ये सांगितले कारण - चिठ्ठीत तिने आकाश हा लग्न कर नाही तर तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देत असल्याचे नमूद केले होते. तसेच त्याची आई व वडील हे तू आमच्या मुलासोबत लग्न केले नाही तर तो मरून जाईल असे म्हणत त्रास देत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे अधिक तपास करत आहेत.
0 Comments