सोलापूर शहरातील उन्हाचा पारा 42 वर, सोलापूरकर उकाड्यामुळे भलतेच हैराण




सोलापूर जिल्हा उष्णकटिबंध म्हणून ओळखला जातो. गेल्या आठवडाभरापासून सोलापूर शहरातील उन्हाचा पारा 42 सेल्सियसवर गेला आहे. प्रचंड उकाड्यामुळे सोलापूरकर हैराण झाले आहेत. कोणाच्या तडाख्यामुळे नागरिकांच्या शरीराची लय लय होताना दिसत आहे. नारळपाणीवाले, उसाच्या रसवाले, लिंबू सरबतवाले, टरबूजवाले, ताक वाले, आईस गोळेवाले यांची मागणी वाढली आहे. 

गेल्या मार्च महिन्यामध्ये उन्हाचा तडाका वाढत गेला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर शहरात उन्हाचा पारा

41.4 वर पोहोचला आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास सोलापुरातील रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून येते. सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये उन्हाचा तडाका अजून वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Post a Comment

0 Comments