MIM चा प्रस्ताव राष्ट्रवादीनं धुडकावला, आमच्यासाठी विषय संपला : शरद पवार


MIM चा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावला आहे. एमआयएमचा सोबत येण्याचा प्रस्ताव शरद पवार यांनी धुडकावला आहे. राज्यात दोन दिवस सुरु असलेल्या चर्चा यामुळं थांबण्याची शक्यता आहे.

कोणत्या पक्षासोबत जायचं ते सांगू शकतात. मात्र, ज्या पक्षासोबत जायचं त्यांनी हो म्हटलं पाहिजे. हा राजकीय निर्णय आहे, हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता प्रस्तावित केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून राज्याला तो निर्णय घ्यायचा अधिकार नाही. राष्ट्रीय समिती यासंदर्भात निर्णय घेत नाही तोपर्यंत राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकत नाही, असं शरद पवार म्हणाले. हा आमच्या दृष्टीनं विषय संपला आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. राज्याला यासंबंधीचा निर्णय घेऊ शकता हे राष्ट्रीय समिती स्पष्ट करत नाही तोपर्यंत कुठल्याही राज्यात हा निर्णय घेता येणार नाही, असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहे, पण आमच्या दृष्टीनं आणि माझ्या दृष्टीनं हा विषय संपल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments