IAS टीना दाबी पुन्हा लग्न करणार, 'हा' मराठमोळा ।AS जोडीदार?वयाच्या एकविसाव्या वर्षी 2016 मध्ये फर्स्ट टाइम मे यूपीएससी उत्तीर्ण झाल्यामुळे टीना दाबी या भारताला सर्वपरिचित झाल्या होत्या, त्यानंतर सेकंड सेकंड ट्रेन का आलेल्या अहतर बरोबर त्यांनी लग्न केले परंतु ते फार काळ टिकू शकले नाही, दोनच वर्षात त्यांनी घटस्फोट घेतला. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत मराठमोळा आयएएस अधिकारी प्रदीप गावडे यांच्या बरोबर लगीन गाठ बांधणार आहेत.

टीना दाबी 2013च्या बॅचचे आयएएस प्रदीप गावंडे  यांच्याशी लग्न करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोघेही 22 एप्रिलला जयपूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये लग्न करणार आहेत. टीना दाबी यांनी 2018मध्ये आयएएस अतहर खान यांच्याशी लग्न केले होते, पण हे लग्न दोन वर्षांपेक्षा जास्त टिकू शकले नाही. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.

टीना दाबी आणि प्रदीप गावंडे या दोघांनीही इंस्टाग्रामवर आपले एकत्र फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही जे ! मला दिलंय, ते मी परिधान केलंय’. या फोटोत दोघांनीही लाल रंगाचे कपडे घातले आहेत आणि हातात हात घालून ते हसत आहेत.

 यांचे लग्नही खूप चर्चेत आहे. कारण, या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. टीना दाबी यांनी पहिले पती अतहर खान यांच्यापासून घटस्फोट घेतला आहे. त्याचबरोबर आयएएस प्रदीप गावंडे यांचेही हे दुसरे लग्न आहे. UPSC मध्ये टॉप केलेल्या टीना दाबी यांनी 2016मध्ये टॉप केल्यानंतर दर दोन वर्षांनी तीन मोठे निर्णय घेतले. आधी 2018 मध्ये अतहर यांच्याशी लग्न केले. लग्नाच्या दोन वर्षांनी 2020मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी म्हणजे 2022मध्ये प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्रात झाला. ते चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. प्रदीप यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी एमबीबीएस झाले आहेत.

सर्वात प्रसिद्ध IAS अधिकाऱ्यांच्या यादीत टीना दाबी यांचा समावेश आहे. सोशल मीडिया असो की मीडिया, त्या नेहमीच माध्यमांत चर्चेत असतात. टीना यांचे इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. ऑल इंडिया सर्व्हिसेस टॉपर टीना दाबी यांची त्याच वर्षी दुसरे टॉपर बनलेल्या अतहर यांच्याशी ओळख झाली. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2018मध्ये लग्न केले होते. त्यावेळी या लग्नाची खूप चर्चा झाली होती. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि काही कारणास्तव दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

Post a Comment

0 Comments