खर्डी येथील १८ मार्च रोजी तीन युवक देवदर्शन करून परत येत असताना समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या भीषण अपघातात किरण सुधाकर गुजले अजित शशिकांत मंडले अक्षय आण्णासो मलमे पाटील या तिघांचा जागीच मृत्यू झाला आणि खर्डी गावावर शोककळा पसरली.
यावेळी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधानदादा अवताडे हे पंढरपूर दौरा करत असताना त्यांना ही बातमी समजताच पुढील कार्यक्रम रद्द करून लगेच त्याचक्षणी १८ मार्च रोजी खर्डी येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करून त्यांना आधार दिला. यावेळेस या युवकांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे आपल्या आई वडिलांना आपली मुलं हाताशी आल्यानंतर आधार मिळतो तो आधार आज हरपल्यामुळे जे दुःख झाले आहे हे मनाला वेदना करणारे आहे. आपल्या दुखात आवताडे परिवार सदैव कुटुंबा सोबत असेल अशी भावना आमदार आवताडे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सोबत प्रणव परिचारक,सरपंच भगवान सवाशे मा.सरपंच रमेश हाके,शरदभाऊ रोंगे,दत्तात्रय यादव,समाधान रोंगे,योगेश रोंगे,देवीदास रोंगे,डॉ.शहाजी साबळे,भैय्या पाटील,नारायण रोंगे ,मोहन रोंगे,दाजी चंदनशिवे, अविनाश मोरे,सुनील रणदिवे, व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments