छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेटनं अनेक हिट मालिकेंमध्ये काम केलं आहे. सुंदरतेच्या बाबतीत ती अनेक अभिनेत्र्यांना टक्कर देते. अलीकडेच ती सोशल मीडियावर कोणता न कोणता फोटो शेअर करून चाहत्यांचे तापमान वाढवत असते. तिच्या लेटेस्ट फोटोनं सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.
जेनिफरनं हा फोटो सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तिनं निळ्या रंगाचा शिमरी ड्रेस घातला असून, ती पाण्यामध्ये भिजताना दिसत आहे. फोटोमधील तिचे एक्सप्रेशन अगदीच बोल्ड आहे. फोटोमध्ये आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं नाकात नथ घालून, हातात मोठे कड घातले आहे. फोटोमधील तिचा लूक प्रचंड कातिल आहे.
या लूकमध्ये जेनिफरनं तीन फोटो शेअर केले आहे. तिन्ही फोटोमध्ये ती पाण्यात भिजताना दिसत असून, पोज मात्र वेगवेगळ्या दिल्या आहेत. प्रत्येक पोजमध्ये तिचा अंदाज अनोखा आहे. तिनं फोटोखाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘एक वेगळ्या प्रकारचं हिऱ्याचं पडणं.’
दरम्यान, जेनिफर विंगेटनं ‘शाका लका बूम बूम’, ‘कुसुम’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘सरस्वतीचंन्द्र’ ,’बेहद’ आणि ‘बेपनाह’ यांसारख्या हिट मालिकेंमध्ये काम केलं आहे.
0 Comments