"वाघ आपल्याला घाबरत का नाही?”; रोहित पवारांची फेसबुक पोस्ट चर्चेत


 राज्यात आज एकीकडे नागरिक दोन वर्षांनी निर्बंधमुक्त धुळवड साजरी करत असताना दुसरीकडे राजकारणात मात्र गेल्या काही महिन्यांपासून आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरु आहे. एकीकडे सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत असताना विरोधकही भ्रष्ट्राचाराची प्रकरणं बाहेर काढत आरोप करत आहेत.

राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय धुळवडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना उत्तर दिलं असून वाघाचं उदाहरण दिलं आहे. रोहित पवार यांनी यावेळी फेसबुक पोस्टसोबत व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

रोहित पवार मुलांसोबत वाघ पाहण्यासाठी गेले होते. यावेळी वाघ दिसल्यानंतर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा क्षण शेअर केला असून यानिमित्ताने राजकीय भाष्यदेखील केलं आहे. 

रोहित पवारांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, “जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा आज काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली. साक्षात वाघ बघून मुलं खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही?असं विचारलं. मी त्यांना म्हणालो, वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो.

म्हणूनच आपणही वाघासारखंच राहायचं असतं आणि प्रामाणिकपणे काम करताना कोण काय म्हणतंय याकडं ढुंकूनही बघायचं नसतं. हत्तीसुद्धा रस्त्याने जात असताना आजूबाजूला ओरडणाऱ्यांकडं लक्ष देत नसतो. हे ऐकून मुलंही म्हणाली, “महाराष्ट्रही असाच आहे ना बाबा!”.

Post a Comment

0 Comments