नारायण राणेच्या सुपुत्रांवर गुन्हा दाखल


आपल्या वक्तव्यांनी राणे कुटुंबीय अडचणीत आले आहे.मागच्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिशा सालीयनच्या मृत्यूला घेऊन राणेंनी प्रश्न उपस्थित केले होते.नंतर दाखल झालेल्या तक्रारीने राणेंच्या अडचणी वाढल्या.शरद पवार यांच्यावर केलेले बेछुट आरोप भाजप आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण,याप्रकरणात मरिनड्राईव्ह पोलिसांनी नारायण राणे यांच्या दोन्ही सुपूत्रांवर गुन्हा दाखल केला आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांना झालेली अटक, अधीश बंगल्यावरील कारवाईची टांगती तलवार आणि त्यानंतर आता नव्याने दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे राणे कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

 निलेश राणे यांनी नुकतीच आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यामध्ये त्यांनी शरद पवार यांचे नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडले होते. तर नितेश राणे यांची आझाद मैदानातील मोर्चादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. याच कारणावरून नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणात आता पोलीस या दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार किंवा पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments