सोलापूरचे सोडा, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही 'पत्रककार' तर ५०० रुपये घेतात...


सोलापूर जिल्ह्यातील उत्तर तालुक्यातील एका जुगार अड्यातून महिन्याला पोलिसांना दिलेल्या रकमेची चिठ्ठी व्हायरल झाली, या चिठ्ठीमध्ये पत्रकारालाही १ हजार रूपये दिल्याचे नमुद आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील काही पत्रककार तर ५०० रुपये घेतात, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे पत्रककार पत्रकारिता नासवत  आहेत, यामुळे पत्रकारिता अधिक बदनाम झाली आहे. अश्या  दळभद्री, दरिद्री, भिकारचोट पत्रकारांना चपलेले हाणले पाहिजे. 

आता परवाच उदाहरण सांगतो,  उस्मानाबाद तालुक्यातील एका सरकारी मेडिकल ऑफिसरने  रुग्णालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बायकोला फोन करून शरीरसुखाची मागणी केली. त्याची रीतसर तक्रार त्या कर्मचाऱ्याने झेडपीच्या सीईओकडे दाखल केली आहे.

ही माहिती एका युट्युब चॅनलच्या पत्रककारास मिळाली, त्याने लगेच त्या महिलेच्या घरी जावून  बाईट घेतली, नंतर या पत्रककाराने  ती बाईट त्या मेडिकल ऑफिसरला दाखवली, मोठी बातमी देणार आहे म्हणून सांगितले, बदनामीच्या भीतीने त्या मेडिकल ऑफिसरने पत्रकाराला ऍडव्हान्स ५०० रुपये दिले. नंतर  रक्कम ठरली.  त्यामुळे  पुढे बातमीच आली नाही. 

असो, लोकांनी सुद्धा अश्या भामट्या पत्रकारांना फाट्यावर मारले पाहिजे. कुणी ब्लॅकमेल करीत असेल तर सरळ एसीबीकडे तक्रार करायला हवी... 

- सुनील ढेपे

Post a Comment

0 Comments