बार्शी! उपळाई (ठोंगे) येतील युवकांचाचा विजेचा धक्का लागून मृत्यूबार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथील युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू मुखी पडल्याचे दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी उपळाई ठोंगे शिवारामध्ये घडली आहे. मोटर चालू करायला गेलेल्या 40 वर्षी युवकाच्या बाबतीत सदर घटना घडली आहे. धनंजय चांगदेव वडेकर वय ४० रा. उपळाई ठोंगे ता. बार्शी अशी मृत्यू झालेल्याचे नाव आहे. उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालय बार्शी येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरने त्याला मयत घोषित केले या घटनेची नोंद बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे, अशी माहिती बार्शी तालुका पोलीस स्टेशन तर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments