कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेसाठी शिवसेना आग्रही असून, जागा काँग्रेसला सोडल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर इच्छुक आहेत. मात्र, ही जागा काँग्रेसला दिल्याने क्षीरसागर कालपासून नॉट रिचेबल आहेत. यामुळे अनेक शिवसैनिकांनी सोशल मीडियावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी नोटाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कोल्हापूर निवडणुकीत काँग्रेसविरुद्ध शिवसेना असा वेगळा वाद रंगण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीची रंगत वाढत चालली आहे. मात्र, या निवडणुकीत शिवसेनेने नरमाईची भूमिका घेतली. हा मतदारसंघा महाविकास आघाडी सरकारकडे असल्याने शिवसेनेने नरमाईची धोरण स्विकारले. या जागेवर शिवसेनेने आधी दावा केला होता. मात्र, आघाडी सरकार असल्याने आता येथून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढविणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच प्रमुख लढत होणार आहे. दरम्यान, आता पुन्हा या जागेसाठी शिवसैनिक आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवा पेच होण्याची शक्यता आहे.
एकीकडे काँग्रेसचे नेते ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस वगळता सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. शिवशक्तीकडून करूणा शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. भाजपने यापूर्वीच सत्यजित कदम यांचे नाव घोषित केले आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक बहुरंगी होणार असेच सध्याचे चित्र असले तरी काँग्रेस आणि भाजपमध्ये खरी लढत रंगणार आहे. परंतु शिवसैनिक नाराज आहेत. त्यांनी नोटाला मतदान करण्याचे आवाहन केल्यामुळे नवा पेच निर्माण झालाय. त्यातच या जागेसाठी आग्रही असणारे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल आहेत.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर ही निवडणूक होत आहे.
0 Comments