पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा नवा चेहरा; जाणून घ्या, भगवंत मान यांचा राजकीय प्रवास


 पंजाबमध्ये प्रसिद्ध कॉमेडियन भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीचे सरकार स्थापन होत आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी हे 'आप'च्या शर्यतीत खूप मागे आहेत. भगवंत मान हे २०११ पासून राजकारणात सक्रिय आहेत. कॉमेडियन म्हणूनही त्यांची ओळख आहे.

भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहे. त्यांच्या नेतृत्वात आपने विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारली आहे. आपला मोठे यश मिळवून देणाऱ्या भगवंत मान यांच्याबद्दल जाणून घेऊ. कॉमेडियन ते राजकारणी म्हणून त्यांच्या झालेल्या प्रवासावर नजर टाकू.

भगवंत मान यांनी पंजाबच्या संगरूर विधानसभेतील धुरी या मतदारसंघातून निवडणूक लढविली. त्यांनी विजय मिळविला आहे. या जागेवर भगवंत मान हे काँग्रेसचे आमदार दलवीर गोल्डी यांच्याशी लढत होते. या भागात जाट शीख मतदारांची संख्या ३४ टक्के, गैर-जट शीख ५ टक्के, सवर्ण ११ टक्के, ओबीसी १५ टक्के आणि एससी मतदारांची संख्या २८ टक्के आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'आप'च्या वतीने एक नंबर जारी केला होता. त्याचबरोबर केजरीवाल यांच्या या कल्पनेला पंजाबमधील २१ लाखांहून अधिक लोकांनी मान्यता दिली. या निवडीच्या आधारावर १८ जानेवारीला 'आप'ने भगवंत मान यांच्या नावाची घोषणा केली होती.

Post a Comment

0 Comments