बार्शी:
पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून बार्शी मध्ये ७-८ जणांनी मिळून एकाला एका युवकाला लोखंडी पाईपाने स्टंप मारहाण केल्याची घटना ६ मार्च रोजी बार्शी शहरामध्ये घडली आहे. नवनाथ दत्तात्रय नारकर (वय ४०) रा. संभाजीनगर बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सात-आठ जणांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे, फिर्यादी व त्यांचा भाचा लखन राजेद्र भंडारे रा.अलिपुर रोड बार्शी असे भगवंत मंदिरा पाठीमागे समर्थ कलेक्शन येथे कपडे खरेदी करिता गेलो, असताना पाठीमागील लखन सोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरुन अनोळखी सात ते आठ इसमानी भाचा लखन भडांरे यास लोखंडी स्टील रड,स्टंप यांने मारहाण करुन त्यास गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे ७-८ जणांवर भारतीय दंड संहिता १४३, १४७, १४८, ३२६, ३२४, १४९, १३५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments