बार्शी तालुक्यातील रस्त्यांसाठी ११ कोटीच्या निधीची तरतूद : खासदार ओमराजे निंबाळकर


बार्शी /प्रतिनिधी:

आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात बार्शी तालुक्यातील 37 किलोमीटर रस्त्याच्या लांबीच्या सुधारणेसाठी अकरा कोटी 70 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. कोरणा काळामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विविध गावांना भेटी दिल्या होत्या,अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची सुधारणा करणे बाबत नागरिकांतून मागणी होत होती. या सर्वांचा विचार करून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा चालवलेला होता या विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार अर्थसंकल्पात रस्त्याच्या सुधारणा कामासाठी तरतुदीचा समावेश झाला व बार्शी तालुक्यातील उर्वरित रस्त्याच्या सुधारणा कामाचा समाज पुढील टप्प्यात होण्यासाठीही पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मंजूर झालेल्या कामाची यादी पुढील प्रमाणे

1) गौडगांव ते कात्री रस्ता ग्रामा 183 किमी 0/00 ते 3/500 मध्ये सुधारणा करणे. ता. बार्शी जि. सोलापूर  1.5 कोटी

2) रुई- अंबाबाईवाडी -ज्योतीबाचीवाडी रस्ता इजिमा 80 किमी. 0/00 ते 10/00 मध्ये सुधारणा करणे ता. बार्शी जि. सोलापूर  2.5 कोटी

3) कासारी ते तालुका हद्द ग्रामीण मार्ग क्र. 90 कि. मी. 0/00 ते 4/00 सुधारणा करणे ता. बार्शी, जि. सोलापूर.  1.2 कोटी

4) तडवळे-दहीटणे-राळेरास रस्ता इजिमा 28 किमी 0/00 ते 8/00 मध्ये सुधारणा करणे ता. बार्शी जि. सोलापूर.  2.5 कोटी

5) श्रीपतपिंपरी ते रा.मा. 145 रस्ता ग्रामा 262 किमी 0/00 ते 5/500 मध्ये सुधारणा करणे ता. बार्शी जि. सोलापूर  2 कोटी

6) शेंद्री ते उपळाई (ठों) रस्ता ग्रामा 102 किमी 0/00 ते 6/00 मध्ये सुधारणा करणे ता. बार्शी जि. सोलापूर  2 कोटी

या अर्थसंकल्पात बार्शी तालुक्यातील रस्त्यांसाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल सबंध तालुका वासियांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments