पोलीस आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या



सोलापूर/प्रतिनिधी:

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील एक सहायक पोलीस निरीक्षकांसह तीन पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बझार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांची बदली गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे.सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक  सचिन औदुंबर माळी यांची  बदली सदर बझार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

शहर वाहतूक शाखा उत्तर येथे कार्यरत असलेले महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री शिवाजी जाधव यांची बदली जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक माधव लक्ष्मण धायगुडे यांची बदली नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments