सेक्स लाईफबाबत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलली दीपिका; म्हणाली, माझ्या मते सेक्स म्हणजे…



बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आज पती रणवीर सिंहसोबत  सुखाचा संसार करत आहे. पण एककाळ असा होता जेव्हा दीपिका अभिनेता रणबीर कपूरच्या प्रेमात वेडी होती. दीपिका आणि रणबीर दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होती. मीडिया रिपोर्टनुसार रणबीर दीपिकाची फसवणूक करत होता. यामुळे दीपिका डिप्रेशनमध्येसुद्धा गेली होती. यासंदर्भात दीपिकाने स्वतः एका मुलाखतीत बोलताना याचा खुलासा केला होता.

रणबीर कपूरसोबतचे नाते तुटल्यानंतर दीपिका आतून खूपच तुटून गेली होती. याबाबत एका मुलाखतीत बोलताना दीपिकाने प्रेम, शारीरीक नातेसंबंध यावरही मोकळेपणाने बोलली होती. तिची ही जुनी मुलाखत आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. दीपिकाने म्हटले होते की, ‘माझ्या मते सेक्स म्हणजे केवळ शारीरीक संबंध नव्हे तर यामध्ये भावनाही जोडलेल्या असतात’.

‘मी कोणत्याही रिलेशनशीपमध्ये असताना कोणाचीही फसवणूक केली नाही. मी जर कोणाची फसवणूक करत असेन तर रिलेशनशीपचा अर्थ काय? यापेक्षा मी एकटं राहणं आणि मजा करणं हे उत्तम, नाही का? पण सर्वचजण माझ्यासारखं विचार करत नसतात. त्यामुळेच बहुशा मी जास्त दुखावली गेले असेन’.

दीपिकाने पुढे सांगितले की, ‘पहिल्यांदा जेव्हा त्याने मला धोका दिला तेव्हा मला वाटलं की, या रिलेशनशीपमध्ये किंवा माझ्यात काही समस्या असेल. पण जेव्हा फसवणूक करणे एखाद्याची सवय होऊन जाते तेव्हा तो पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहतो’.

Post a Comment

0 Comments