बार्शी! घोळवेवाडी येथे सेवानिवृत्त शिक्षकाचा संशयास्पदरीत्या मृत्यू



बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी मध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बेशुद्ध अवस्थेत पडलेले सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत विश्वनाथ घोळवे (वय ६६) यांना पांगरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. 

याबाबत मयताचे भाऊ लक्ष्मन विश्वनाथ घोळवे (वय ६०) यांनी पांगरी पोलीसांत दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे की, चंद्रकांत विश्वनाथ घोळवे हे सोलापूरमध्ये राहत असून तेथून ये-जा करून शेती करत असत. १२ मार्च पुतण्या विठ्ठल चंद्रकांत घोळवे हा शेतात आल्यानंतर भाऊ रामकिसन विश्वनाथ घोळवे या चुलत्या पुतण्यामध्ये गंज लावण्याच्या जागेवरून किरकोळ शिवीगाळ भांडण झाले होते. चंद्रकांत विश्वनाथ घोळव व रामकिसन विश्वनाथ घोळवे यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले. यावेळी लक्ष्मण विश्वनाथ घोळवे यांनी दोन्ही भावास समजावून सांगून कामानिमित्त निघून गेले होते.

त्यानंतर ते परत आल्यानंतर भाऊ चंद्रकांत विश्वनाथ घोळवे हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांना तत्काळ
पांगरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असत त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या घटनेची नोंद पांगरी पोलिसांत झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी घटनेची माहिती जाणून घेतली.

Post a Comment

0 Comments