वैराग/प्रतिनिधी:
वैराग सामान्य नागरिकांच्या व शिवप्रेमी यांचा कायम महत्वाचा असणारा विषय म्हणजे की वैराग येथील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकातील. शिवाजी महाराजांच्या पुतुळ्या शेजारील सर्व बाजूची अतिक्रमणे आणधिकृत टपऱ्या फळांचे गाडे चहा नाश्त्याची गाडे,जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शेजारी च आहेत ते काढण्यासाठी दिनांक १४ मार्च रोजी सर्व वैराग मधील सामान्य तरुणवर्ग नागरिक व शिवप्रेमी यांनी वैराग नगरपंचायतच्या मुख्याधिकारी वीणा पावर यांना निवेदन दिले.
या निवेदनात त्यांनी असे म्हंटले आहे की, गेल्या वर्षभरापूर्वी छ.शिवाजी महाराजांचा अश्वारूढ बसवल आहे, पुतळ्याच्या अनावरण संदर्भात वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्रातील सर्व समाजाचे प्रेरणास्थान आहेत तसेच वैरागच्या या मुख्य चौकात पुतळा बसिवल्यामुळे तेथील चौकाला शोभा देखील आली आहे.
मात्र त्या पुतळ्याच्या शेजारी जी काही आणाधीकृत दुकाने, फळांची गाडे, पान टपरी आहेत. यांच्या मुळे तेथील जागेला व वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे समोरच वैराग येथील ग्रामीण रुग्णालय आहे समोरील त्या अतिक्रमण मुळे एखाद्या पेशंट ला उपचारासाठी दावाखण्यात आणताना किंव्हा घेऊन जाताना ॲम्बुलन्स वाहनचालकाला देखील त्या अतिक्रमण मुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असे कित्येक वेळा तरी निदर्शनास सुद्धा आले आहे. तसेच चौकातून मुख्य गावात प्रवेश करताना तेथील अतिक्रमणं मुळे अनेक नागरिकांना व वाहन धारकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे
शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात झालेली अतिक्रमणे आपण लवकरात लवकर काढावे जर ते अतिक्रमण आणि लवकरात लवकर काढली नाही गेल्यास वैराग येथील सर्व शिवभक्तांच्या वतीने तसेच तरुण वर्गाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा वैराग येथील नागरिक व शिवप्रेमी यांनी दिला आहे. येत्या ३१ मार्च च्या मासिक मीटिंग मध्ये आपला तो मुद्दा मांडून त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे वैराग नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विना पवार यांनी सांगितले आहे.
यावेळी निवेदन देताना नानासाहेब धायगुडे, गणेश देशमुख, जिन्नस उमाप,दिपक माने,मिलिंद गोवर्धन,शुभम जिरंगे, प्रशांत कोळेकर,गणेश शिंदे, रोहित कांबळे, योगेश जाधव,अजय मुळे,भैय्या खेंदाड संदिप गाडेकर, आकाश पौळ, साईराज ढेकळे ,अशय सोनवणे,विपूल खेंदाड तसेच वैराग येथील सर्व शिवप्रेमी व तरुण वर्ग उपस्थित होते.
0 Comments