बारामती ॲग्रो टीमने केली संतनाथ कारखान्याची पाहणी



बार्शी तालुक्यातील पहिला सहकारी तत्त्वावर चालू करण्यात आलेला संतनाथ कारखाना हा गेल्या पंधरा वर्षापासून बंद स्थितीत आहे. आपण जर निवडून आलो तर संतनाथ साखर कारखाना सुरु करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भुमकर यांनी वैरागकराना दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज बारा मार्च रोजी बारामती ॲग्रो टीमने कारखान्याची पाहणी केली.
आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच संतनाथ कारखाना सुरू करू असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन भुमकर यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. कारखाना चालु झालातर येथील शेतकऱ्यांनची होणारी फरफट थांबेल. तसेच बेरोजगार तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल.बाजार पेठ भक्कम होईल राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना कळलेली आहे.
त्याचच फळ म्हणून आमदार रोहितदादा पवार यांच्या बारामती ऍग्रो ची टीम यांनी निरंजन भुमकर यांच्या समवेत कारखान्यातील सर्व मिशनरींची  पाहणी केली. असुन याचा संपूर्ण अहवाल आमदार रोहित दादा पवार यांना दाखवुन कारखाना चालु करण्यासंदर्भात कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल अशी माहिती बारामती ऍग्रो च्या टिम ने दिली.

Post a Comment

0 Comments