दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे यामध्येच राज्यस्थान मधील आमदार पुत्राने धक्कादायक प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. रेणी परिसरातून दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीचं अपहरण करून मंडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महुआ मंदावर रोडवर असलेल्या समलेती पॅलेस हॉटेलमध्ये पीडितेला नेण्यात आले. या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली .
या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे.अलवर जिल्ह्यातील राजगड विधानसभेचे आमदार जोहरी लाल मीणा यांचा मुलगा दीपक मीणा याच्यासह तिघांवर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील मंडावर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीएसपी ब्रिजेश कुमार या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
0 Comments