अक्कलकोट/प्रतिनिधी:
अक्कलकोट तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीसानी आरोपी नागेश चलगेरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ४मार्च रोजी सकाळी १०वाजत घडली.
याबाबत अकललकोट दक्षिण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अपराधपासून सरंक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडितेच्या वडिलांनी तक्रार नोंदवली आहे. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी अल्पवयीन असताना नागेश याने तिला लग्न करतो असे सांगून शिवचलेश्वर मंदिरात नेले. तिच्या मनास लज्ज वाटेल असे कृत्य केले अधिक तपास फौजदार बाडीवाले करत आहेत.
0 Comments