बार्शी/प्रतिनिधी:
पेट्रोल पंप मालकाने व पूत्राने मिळुन केली कामगारास मारहाण. बार्शी शहरातील कुर्डवाडी रोड वरील भारत पेट्रोलपंपावरील ही घटना. कामगार कृष्णा दतात्रेय सुरवसे (वय १७) रा.वाणी प्लॉट बार्शी याने बार्शी शहर पोलीस ठाण्यात पेट्रोलपंप मालक राजेंद्र तानाजी कदम व अभिषेक राजेंद्र कदम यांचा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्या पासुन मी राजेंद्र कदम यांच्या पेट्रोल पंपावर काम करत होतो.मला पगार नाही दिली म्हणुन मी घरी बसून होतो.मला नेहमी कामाला ये म्हणत .पगार देतो तू कामाला तर ये अस म्हणाले म्हणून मी १६ मार्च ला मी पुन्हा कामावर आलो. नंतर मी पगार मागितली असता म्हणाले की पेट्रोल कमी टाक व तुजी पगार काढ.असे बोल्यामूळे मी पुन्हा घरीच राहिलो.नंतर माझ्या आई च्या मोबाईल वर २४/३/२०२२रोजी सायंकाळी.६.५२ राजा कदम यांचा फोन आला की मुलाची पगार देतो त्याला पाठऊ दया.मी ७ वा.पेट्रोलपंप गेलो असता मला गोड बोलून त्यांच्या ऑफिसात नेले व शिव्या देत मला मरायला सुरवात केली.तेवढ्यात त्यांचा मुलगा अभिषेक कदम ही आला.त्याने ही मला मारण्यास सुरवात केली.मला लाकडी दांडक्याने मारले.
झालेली घटना मी बार्शी पोलीस ठाण्यात सांगितली व फिर्यादी ला मारले असल्याने मेडिकल साठी बार्शीशहरातील ग्रामीण रुग्णालय पाठले असता त्यांनी उस्मानाबाद येथील सरकारी रुग्णालय पाठले सदर माहिती आधारे पोलिसानी भारतीय दंड संहिता ३२३,३२४, ३४,५०४,५०६ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments