पंढरीत राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्षांची झाली भेट



राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  सुनील गव्हाणे यांची आज मंगळवारी राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष  नागेश फाटे यांचे पंढरपूर येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट घेतली.  आज सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने गाव तिथे शाखा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  सुनील गव्हाणे पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष  नागेशदादा फाटे यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
 
या प्रसंगी  प्रदेशाध्यक्ष गव्हाणे यांनी वेबसाईट व सदस्य नोंदणी अभियान  संदर्भात चर्चा करून  नागेश फाटे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पंढरपूर तालुका कार्याध्यक्षपदी ओंकार जगताप यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष  सुहास कदम, जिल्हाध्यक्ष राहुल कवडे, शेखर भालके, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव सागर पडगळ, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रणव गायकवाड, उद्योग व व्यापार विभाग प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे, सतीश बागल, डॉ. रमेश फाटे, पंढरपूर शहराध्यक्ष ऋषिकेश रोकडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रंणजीत खुर्द, तुषार देठे , शुभम साळुंखे , प्रवीण खरात , सुनील चव्हाण, सचिन देठे , रोहित आटकळे  आदी पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments