बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद सध्या चर्चेत आहेत. सबा आणि हृतिकची माजी पत्नी सुझानचीही चांगली बॉन्डिंग होती. आता, दोघांच्या भेटीगाठीमुळे त्यांच्या लग्नाच्या अफवांना हवा मिळाली आहे. मात्र, दोघांनीही या गुप्त नात्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
आता हृतिकच्या मित्राने दोघांच्या लग्नासंदर्भात खुलासा केला आहे. हृतिक आणि सबाच्या एका जवळच्या मित्राने सांगितले की, ‘दोघेही एकमेकांना आवडतात. हृतिकच्या कुटुंबाला सबा खूप आवडते. हृतिकप्रमाणेच, कुटुंबाला सबाचे संगीत क्षेत्रातील काम आवडते. नुकतीच सबा घरी आली तेव्हा तिने कुटुंबासोबत म्युझिक सेशन केले. हृतिक आणि सबा एकत्र आहेत, पण त्यांना रिलेशनशिपमध्ये अजिबात घाई करायची नाही. अजून लग्नाचा निर्णय घ्यायला वेळ असेल.’
0 Comments