भूम/प्रतिनिधी:
भूम तालुक्यातील सोनगिरी सोनगिरी तलावात २१ मार्च रोजी संध्याकाळी एक मृतदेह आढळला होता त्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान बनवत बनले होते. पोत्यात पाय बांधलेल्या अवस्थेतील एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह भुम पेालीसांनी २४ तासात त्या मृतदेहाची ओळख पटवली असुन हा मृतदेहाची मांडवा ता.भुम येथील युवराज त्रिंबक पाटील (वय-४५) यांचा असल्याचे पोलीसांनी निष्पन्न केले.
गावकरी निलेश काळे यांनी जुना वैमनस्यातुन युवराज यांचा गळफास देऊन खुन केला असुन पुरावा नष्ट करण्याच्या उददेशाने तलावात मृतदेह फेकला आहे. अशा मजकुराची प्रथम खबर मयताचे पुतने- दत्तात्रय पाटील यांनी दि.२२ मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं कलम ३०२,२०१ अंतर्गत् गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments