रविंद्र जडेजा नाबाद १७५, भारताचा ८ बाद ५७४ वर डाव घोषितआयएस बिंद्रा पीसीए स्टेडियमवर शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने धावांचा डोंगर रचला आहे. रविंद्र जडेजाच्या झुंझार शतकी खेळीने श्रीलंकन गोलंदाजांचे अक्षरशः दमछाक उडाली.

भारताच्या वतीने खेळताना मयंक अग्रवाल ३३ व रोहित शर्माने २९ धावा करीत पहिल्या दिवसाची सुरूवात केली होती. त्यानंतर हनुमा विहारीने अर्धशतक ठोकून सर्वांची वाहवा मिळवली. त्याने ५८ धावा काढल्या. आपला शंभरावा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने दमदार सुरूवात केली , परंतु अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो ४५ धावावर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतने तडाखेबंद फलंदाजी केली. परंतु अखेरच्या क्षणी त्याला शतकाने हुलकावणी दिली. ऋषभ ९६ धावावर बाद झाला. श्रेयस अय्यरने २७ धावा केल्या.

सामन्याचा दुसरा दिवस संस्मरणीय बनवला तो रविंद्र जडेजाने. जडेजा नाबाद १७५ धावा काढून भारताचा डावाला मजबूत बनवले आहे. अखेरच्या क्षणी त्याला मोहम्मद शामीने नाबाद २० धावा काडून चांगली साथ दिली. भारताने ८ बाद ५७४ वर आपला पहिला डाव घोषित केला आहे.

Post a Comment

0 Comments