घटस्फोटानंतर २०० कोटी रुपयांची पोटगी धुडकावणाऱ्या अभिनेत्रीची का होतेय एवढी चर्चा?



मुंबई : लग्नबंधनात अडकताना साता जन्मांची साथ निभावण्याची वचनं एकमेकांना दिली जातात. काहींना जोडीदाराची अशी साथ मिळते, तर काहीजणांच्या नशिबबात मात्र वेगळीच वळणं लिहिलेली असतात. मग इथे तुमची श्रीमंती, प्रसिद्धी सारंकाही फिकं पडतं. जगण्यात इतकी हतबलता येते की त्यातून सावरावं कसं हाच प्रश्न उभा राहतो.

अभिनेत्री समंथा हिला घटस्फोटाची झळ सोसावी लागली. पतीपासून वेगळं होणं अर्थात तिच्यासाठी कठीण होतं, पण या लढाईत तिनं स्वबळावर स्वत:ला सावरण्याचा निर्णय घेतला. आता यातून ती बाहेरही पडताना दिसत आहे. पण, कमालीची लोकप्रियता असल्यामुळं भूतकाळ काही तिची पाठ सोडताना दिसत नाही. ही अभिनेत्री आहे समंथा रुथ प्रभू.

दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याच्याशी समंथाचं लग्न झालं होतं. त्यानंतर जे काही घडलं ते आता सर्वज्ञात आहे. असं म्हणतात की समंथानं 200 कोटी रुपयांची पोटगीही नाकारली होती. हीच समंथा आता मोठ्या आत्मविश्वासानं पुन्हा एकदा कलाजगतामध्ये वावरु लागली आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती एका पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आली

Post a Comment

0 Comments