सोलापूर! पैशाच्या कारणावरून पतीने पेटविले घर



सोलापूर:

 पत्नीने पतीस हातउसने पैसे घेतल्याबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून चिडून जाऊन पतीने घराला आग लावल्याची घटना घडली. या घटनेत संसारोपयोगी साहित्य जळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी सुजाता श्यामसुंदर भंडारी (वय ३९, रा. अंबिकानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती श्यामसुंदर भंडारी यांच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना अंबिकानगरातील नक्का वस्ती येथे सोमवारी घडली. या दुर्घटनेत टीव्ही, कुलर, लाकडी बेड, प्लॅस्टिक खुर्ची, कॉम्प्युटर व लोखंडी कपाटाचे नुकसान झाले.

Post a Comment

0 Comments