तिहेरी तलाक कायद्यान्वये सोलापूरात गुन्हा दाखल


तलाक तलाक तलाक तीन वेळा तलाक शब्द उच्चारून पत्नीला तलाक देण्याची धमकी देणाऱ्या पतीविरुद्ध मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 4 च्या 2019 नुसार राज्यात दुसऱ्यांदा तर सोलापूर शहर जिल्ह्यात पहिल्यांदाच सदर बाझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तस्किन इजाज अहमद शेख वय 23 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती एजाज अहमद शेख सासरे इम्तियाज शेख पतीचा मित्र आयाज शेख यांच्यासमोर पतीने तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हटल्याने तसलीन यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा चार 2019 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हा कायदा अमलात आल्यापासून ठाणे मुंब्रा पोलीस ठाण्या नंतर महाराष्ट्रातील दुसऱ्यांदाच सोलापुरात या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. मुस्लिम हिंदू विवाह संरक्षण कायदा 4 ची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ लागल्याने तिहेरी तलाका हा आता सोलापुरात चर्चेचा विषय ठरला आहे. गुन्हा ठरवणारा कायदा त्याद्वारे अस्तित्वात आला.

 तलाक हा शब्द तिहेरी उच्चारून पत्नीला सोडणे हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी मुस्लिम पुरुषाला तीन वर्षे तुरुंगावास देण्याची तरतूद या विधेयकात केली आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी होत असल्यामुळे मुस्लिम विवाहित महिलेला विवाह संरक्षण मिळत असल्याचे बोलल जातय.

Post a Comment

0 Comments