भारतीय जनता पक्षाकडून चार राज्यात आघाडी मिळवली आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हलगी वाजवून जोरात स्वागत केले यावेळी भारतीय जनता पार्टी व आम आदमी पार्टीच्या सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. कार्यकर्त्यांकडून गुलाल व जिलेबी वाटप करण्यात आली.
पंढरपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील विजयाचा आनंद साजरा केला यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय ,भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे शेतकरी मोर्चा चे सचिव माऊली हळणवर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष म्हस्के यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे या विजयाचा जल्लोष करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम आदमी पक्षाचे जिल्हा संघटक दिनकर मोरे पाटील यांचे नेतृत्वाखाली फटाके उडवून आनंद उत्सव साजरा केला.
0 Comments