अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे परंडा येथील एकाचा मृत्यू



बार्शी रस्त्यावरील सिनाकोळेगाव वसाहती जवळ गणेश बनसोडे यांना अज्ञात वाहणाने जोरदार धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मुत्यू झाला. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  
गणेश प्रफुल्ल बनसोडे हे मोटार सायकल वरून बार्शी कडे जात असताना त्यांचा अपघात झाला.

 बनसोडे यांना उपचारासाठी परंडा उप जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते परंतु गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथिल जगदाळे मामा रुग्यालयात नेहन्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषीत केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments