दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाजवळील पाटील व हिरजे या दोन कुटुंबियाच्या घरी पाच दरोडेखोरांनी बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.बाबू कल्लप्पा हिरजे या ६५ वर्षीय वृद्धाचा दरोडेखोराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
बुधवारी पहाटे दिड ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास पाच दरोडेखोर बोरामणीत आले.सुरवातीला बाबू हिरजे यांच्या घरी दरोडा टाकला.बाबू हिरजे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते.दरोडेखोरांनी बाबु हारजे यांच्या पत्नीला चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील व कानातील ३ तोळ्या सोने हिसकावून घेतले.दरोडेखोरांना प्रतिकार करणारे बाबू हिरजे यांच्या डोक्यात दरोडेखोरांनी धारदार हत्याराने वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यानंतर दरोडेखोर पाटील यांच्या घरांपर्यंत पोहोचले.पाटील हे जागे झाल्याने त्या ठिकाणी दरोडे टाकण्याचा प्रयत्न फसला.दरोडेखोरांच्या झालेल्या झटापटीत पाटील यांच्या हाताला चाकू लागला.पाटील हे मोठमोठ्यांने आवाज केल्याने दरोडेखोर तिथून पळून गेले.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी घटनास्थळी झाले.बाबू हिरजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरातील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.दरोडेखोरांच्या या धाडसी हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
0 Comments