मुंबई :
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाच्या रिलीजपासून सतत चर्चेत असते. या सिनेमाच्या यशामुळे सध्या सर्वत्र आलिया भट्टचीच चर्चा आहे.
अलीकडेच महेश भट्ट यांनी एका मुलाखतीदरम्यान आलिया भट्टबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सोबत महेश भट्ट यांनी आलियाच्या काही वैयक्तिक गोष्टींचा ही खुलासा केला. त्यांनी मुलाखतीत सांगितले की त्यांच्या मुलीचा प्रियकर रणबीर कपूर तिला कोणत्या नावाने हाक मारतो.
चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी मुलाखतीत त्यांची मुलगी आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडी या नवीन चित्रपटाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तसेच महेश भट्ट यांनी सांगितले की, रणबीर कपूरला आलिया 'एलियन' वाटते. त्यामुळे महेश भट्ट आणि रणबीर दोघेही आलियाला एलियन म्हणून हाक मारतात.
0 Comments