पंढरपूर
'शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज द ओवर' असे म्हणत पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील युवा शेतकऱ्यांने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुरज जाधव असे व्हिडिओ तयार करतात विष प्राशन केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ पंढरपूर तालुक्यात वायरल झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील एका तरुण शेतकरी सूरज जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका अज्ञात स्थळी बसून हातात विषाची बाटली पकडली होती व एका हातांमध्ये सूरजने व्हिडीओ सुरू करून विषाची बाटली दाताने उघडली आणि पिण्याच्या आधी त्याने शेतकरी म्हणून असलेल्या दुःखाची माहिती करून दिली व त्यानंतर त्याने विष प्राशन करून बाटली फेकून दिली त्यानंतर त्याला पंढरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मगरवाडी येथे सुरज जाधव याची शेती आहे मात्र त्या शेतामध्ये म्हणावे तसे उत्पादन मिळत नसल्यामुळे सुरज हातात झाला होता शेती करत असताना अनेक अडचणी येत होत्या त्यातूनच हताश होऊन सूरजने टोकाचे पाऊल उचलत 'शेतकऱ्यांच्या पोटी आपण परत कधीच जन्माला येणार नाही, शेतकऱ्यांसाठी हे सरकार काही करू शकत नाही, गेम इज द ओवर' असे सुरज याने विषाचा कडवा घोट घेतला. सदर घटनेमुळे पंढरपूरसह जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
0 Comments